13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरा तिरंगा लावा पंतप्रधान नरेंद्र मोदी “हार घर तिरंगा”

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत देशवासीयांनी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर किंवा ऑफिसवर तिरंगा लावावा, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. देशाचा राष्ट्रीयध्वजा हा स्वतंत्र्याचे व राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आहे असे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
घरावर किंवा आपल्या ऑफिस वर तिरंग लावल्यावर त्याचे छायाचित्र व फोटो ‘हर घर तिरंगा’ या वेबसाईटवर अपलोड करावे. असे सांगून पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात की प्रत्येक भारतीय नागरिक तिरंगा ध्वजाशी भावनिकदृष्ट्या जोडला गेलेला आहे. देशाच्या विकासासाठी अधिक मेहनत करण्याची प्रेरणा राष्ट्रध्वज आपणास देतो. राष्ट्रध्वजासोबत घेण्यात आलेल्या 5 कोटी 6 लाख 12 हजार सेल्फी वेबसाईटवर अपलोड झालेले आहेत. स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवचे औचित्य साधून पंतप्रधान मोदी यांनी गत वर्षाच्या जुलै महिन्यात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची सुरुवात केली.

Leave a Comment